ऊस बिलापोटी दिलेले धनादेश वटलेच नाही

Foto
पैठण : सचिन घायाळ शुगर कंपनीस सन २०१८-१९ गळीत हंगामात तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी ऊस गाळपासाठी दिला होता. ऊस बिलापोटी सचिन घायाळ शुगर लि.कंपनीने रोख रक्कम देण्याऐवजी नियम धाब्यावर बसवून धनादेश दिले . परंतु हे धनादेश कंपनीच्या खात्यात रक्कम नसल्याने न वटता परत आले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी की, संत एकनाथ सहकारी साखर कारखाना लि. पैठण संचलित सचिन घायाळ शुगर कंपनीस तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांनी आपला ऊस गाळपासाठी दिला आहे. ऊस गाळपासाठी दिल्यानंतर १५ दिवसाच्या आत ऊसाचे बिल शेतकर्‍यांच्या खात्यात रोख रक्कम जमा करणे आवश्यक आहे .मात्र सचिन घायाळ यांनी दोन ते तीन महिने उशिराने धनादेश दिले. ते पण दोन महिने आधीची तारीख टाकून धनादेश शेतकर्‍यांना वाटप करण्यात आले . शेतकर्‍यांनी धनादेश वटविण्यासाठी विविध बॅकेत आपल्या खात्यात जमा केले .तर काही शेतकर्‍यांना बंधन बॅकेत खाते उघडण्यासाठी भाग पाडले होते.सचिन घायाळ शुगर कंपनीचे सुद्धा खाते बंधन बॅकेत उघडण्यात आले.मात्र कंपनीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यानेसचिन घायाळ शुगर कंपनीने शेतकर्‍यांना दिलेले धनादेश वटले नाही. धनादेश वटले नाही तरी ते परत पाठवू नका ते थांबून ठेवा असे बॅक कर्मचार्‍यांना कंपनीच्या वतीने सांगण्यात 
आल्याने बॅक कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांचे धनादेश आठ ते दहा दिवस दाबून ठेवले.नियमानुसार बॅकेत वटविणयासाठी आलेले धनादेश तिन दिवसाच्या आत रिटन पाठविले आवश्यक असते. 

मात्र बंधन बॅकेत दहा-दहा दिवस धनादेश दाबून ठेवण्यात आले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले.या बाबतीत शेतकर्‍यांनी बॅकेत विचारले असता आम्ही संबंधित बॅकेचे कर्मचारी आल्यावर त्यांच्याकडे पाठवून देवू असे उत्तर बॅकेचे कर्मचारी शेतकर्‍यांना देवू लागले. या बाबत सदर प्रतिनिधीने बंधन बॅकेत जावून संबंधित कर्मचार्‍यांना विचारले असता सचिन घायाळ यांनी मी खात्यात पैसे जमा करतो. धनादेश परत पाठवू नका असे सांगितले. शिवाजी नागरी सहकारी बँक,औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा नारळा,वैद्यनाथ बॅक ,महाराष्ट्र ग्रामीण बॅक,अशा विविध बॅकेत जमा करण्यात आलेले धनादेश न वटता परत गेले आहेत.जवळपास एक ते दिड कोटीचे धनादेश बाउंस झाले असल्याचा अंदाज आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker